रबाडाने आयपीएल सोडली, गुजरात टायटन्सला धक्का

गुजरात टायटन्सला खूप मोठा धक्का बसला आहे. दक्षिण आफ्रिकन वेगवान गोलंदाज आणि गुजरातच्या गोलंदाजीचे अस्त्र असलेला कॅगिसो रबाडाने वैयक्तिक कारणामुळे आयपीएल मध्येच सोडण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ दोन सामने खेळलेला रबाडा आता पुढील किती सामने उपलब्ध नसेल, याबाबत संघव्यवस्थापनाने कोणतीही माहिती दिलेली नाही. रबाडा काही महत्त्वाची खासगी प्रकरणे मार्गी लावण्यासाठी अचानक मायदेशी परतला आहे. बुधवारी बंगळुरूविरुद्ध झालेल्या सामन्यात  रबाडाऐवजी अर्शद खानला संधी देण्यात आली होती. यंदाच्या मोसमात अचानक मायदेशी परतणारा रबाडा हा पहिलाच विदेशी खेळाडू आहे.