
आयकर कला आणि क्रीडा मंडळ तसेच श्री स्वयंभू रामेश्वर क्रीडा मंडळाचे माजी कबड्डीपटू रमाकांत कहाणे यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ते 68 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे व सून असा परिवार आहे. श्री स्वयंभू रामेश्वर को-ऑप. हौसिंग सोसायटीचे (कल्याणदास वाडी) सन्माननीय अध्यक्ष तसेच बृहन्मुंबई तेली समाज संस्थेचे माजी पदाधिकारीदेखील होते. त्यांच्यावर भोईवाडा हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. रमाकांत हे एकेरी पट काढण्यात माहीर होते. उजव्या बगलेतून चढाई करणारे रमाकांत हाताने उत्कृष्ट गडी टिपायचे. त्याच्या निधनाने कबड्डी क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.