
कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जॉयमाल्या हे सर्वोच्च न्यायालयात नवीन न्यायाधीश असतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांची नियुक्ती केली आहे. सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायाधीशांच्या कॉलेजियमने त्यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारकडे पाठवली होती.
न्यायाधीश बागची यांना सर्वोच्च न्यायालयात मोठा कार्यकाळ मिळणार आहे. ते मे 2031 मध्ये न्यायाधीश के. व्ही विश्वनाथन यांच्या निवृत्तीनंतर सरन्यायाधीश बनतील. याआधी कोलकाता हायकोर्टाच्या कोटय़ातून अल्तमस कबीर हे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनले होते. 18 जुलै 2013 रोजी सरन्यायाधीशाच्या रूपात न्यायमूर्ती अल्तमस कबीर यांच्या निवृत्तीनंतर कोलकाता हायकोर्टातून कोणीही सरन्यायाधीश बनले नाही. 2 ऑक्टोबर 2031 रोजी जॉयमाल्या हे निवृत्त होतील. म्हणजेच त्यांना सरन्यायाधीश म्हणून चार महिन्यांहून अधिक कार्यकाळ मिळेल. सरन्यायाधीश होण्याआधी ते सहा वर्षांपर्यंत सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती म्हणून काम पाहतील.