
उत्तर प्रदेशात झालेल्या 24 मागासवर्गीयांच्या हत्याकांडाने देश हादरला होता. या हत्याकांडाच्या तब्बल 44 वर्षांनी 24 मागासवर्गीयांना न्याय मिळाला. यात तिघांना दोषी ठरवण्यात आले. 18 नोव्हेंबर 1981 रोजी संतोष सिंह उर्फ संतोषा आणि राधे श्याम उर्फ राधे या दरोडेखोरांच्या टोळीने उत्तर प्रदेशच्या मैनपुरी जिह्यातील दिहुली गावात मागासवर्गीयांवर हल्ला केला. यात महिला, मुलांसह 24 लोकांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले. त्यांनी मोठ्या प्रमाणावर रोकड आणि ऐवज लुटला होता. दरम्यान, खटला सुरू असताना दरोडेखोरांचा नेता संतोष आणि राधेसह 17 पैकी 13 आरोपींचा मृत्यू झाला. एक दरोडेखोर फरार आहे. केवळ तीन दरेडेखोरांवर पूर्ण खटला चालला. विशेष न्यायाधीश इंदिरा सिंग यांनी कप्तान सिंग, राम पाल आणि राम सेवक यांना हत्या, दरोडा, दहशत आणि अवैध शस्त्र इत्यादी गुह्यांत दोषी ठरवले.