
जुन्नर शुगर लिमिटेडचे चेअरमन विठ्ठलराव थोरवे यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, जावई, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.
प्रदुषणमुक्तीसाठी विठ्ठलराव देशभर फिरत होते. ‘सायकल चालवा, इंधन वाचवा, प्रदूषण टाळा’ हा संदेश ते नेहमी समाजाला देत होते. आरोग्य क्षेत्रात कार्य करणाऱ्या ‘निदान’ ग्रुपच्या 40 शाखा आहेत. त्यापैकी नारायणगाव येथील शाखा ही ते सांभाळत होते. दरम्यान, त्यांचा दशक्रिया विधी 22 फेब्रुवारी रोजी जुन्नर तालुक्यातील शिरोली बुद्रुक येथील कुकडी नदी तीरावर होईल.