पत्रकार दिनाचे औचित्य साधून सोमवारी आद्य मराठी वृत्तपत्रकार, संपादक बाळशास्त्राr जांभेकर यांना राज्यभरात अभिवादन करण्यात आले. यानिमित्त पत्रकार संघटनांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले.
मुंबई मराठी पत्रकार संघ येथे बाळशास्त्राr जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. नवी दिल्ली येथेही महाराष्ट्र परिचय केंद्र येथे प्रभारी उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांनी बाळशास्त्राr जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याशिवाय राज्यातील विविध तालुका, जिल्हानिहाय पत्रकार संघटनांनी मराठी वृत्तपत्रसृष्टीच्या जनकाचे स्मरण केले. 6 जानेवारी 1832 रोजी बाळशास्त्राr जांभेकर यांनी ‘दर्पण’ या नावाने पहिले वृत्तपत्र प्रकाशित करून मराठी वृत्तपत्राचा पाया रचला. या घटनेला यंदा 193 वर्षे पूर्ण झाली आहेत. जांभेकर यांच्या स्मरणार्थ दरवर्षी 6 जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा होतो.
प्रतिमा जोशी यांना जीवनगौरव पुरस्कार
मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्यावतीने पत्रकारिता क्षेत्रात भरीव योगदानासाठी दिल्या जाणाऱया सन 2024 या वर्षीच्या उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारांची घोषणा सोमवारी करण्यात आली. पत्रकारिता क्षेत्रात प्रतिष्ठsचा मानला जाणारा ‘कृ.पां. सामक जीवनगौरव पुरस्कार’ ज्येष्ठ पत्रकार प्रतिमा जोशी यांना जाहीर झाला आहे.
उत्कृष्ट पत्रकार (मुद्रित) राज्यस्तरीय पुरस्कारासाठी दैनिक ‘लोकमत’च्या सातारा प्रतिनिधी प्रगती पाटील यांची तर वृत्तवाहिनी उत्कृष्ट पत्रकार (दृकश्राव्य) पुरस्कारासाठी ‘एबीपी माझा’चे पुणे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांची निवड करण्यात आली आहे. वार्ताहर संघाचा उत्कृष्ट सदस्य पुरस्कार ‘पुढारी’चे राजन शेलार यांना जाहीर झाला आहे. 6 जानेवारीच्या पत्रकार दिनाचे औचित्य साधून संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे आणि सरचिटणीस प्रवीण पुरो यांनी आज पुरस्कारांची घोषणा केली.
बाळशास्त्री जांभेकर, यांना ‘भारतरत्न’ द्या! पोंभुर्लेतील कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांकडे मागणी
पत्रकारितेचे आद्यगुरू आचार्य बाळशास्त्र्ााr जांभेकर यांना ‘भारतरत्न’ द्यावे तसेच त्यांच्या नावे कोकणात पत्रकारिता विद्यापीठ सुरू करावे, अशी मागणी आज करण्यात आली. पत्रकार दिनाचे औचित्य साधून आद्य मराठी पत्रकार आचार्य बाळशास्त्राr जांभेकर यांच्या जन्मगावी पोंभुर्ले (ता. देवगड) येथील स्मारक स्थळी जर्नालिस्ट युनियनचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष नारायण पांचाळ यांच्या हस्ते बाळशास्त्राr जांभेकर यांच्या पुतळय़ास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बाळशास्त्र्ााr जांभेकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी पत्रकारांनी एकमुखाने केली.
बाळशास्त्राr जांभेकर यांचे पाचवे वंशज सुधाकर जांभेकर यांच्या घरी विविध पत्रकारांनी भेट दिली. जर्नालिस्ट युनियनचे महाराष्ट्र अध्यक्ष नारायण पांचाळ यांनी यावेळी ‘भारतरत्न’ पुरस्कार व जांभेकरांच्या नावाने कोकणात पत्रकारिता विद्यापीठ सुरू करण्याच्या मागणीचा पाठपुरावा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असे सांगितले.