हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया लष्कराच्या ‘ऑस्ट्राहिंद’ या संयुक्त लष्करी सरावाचे पुण्यात आयोजन करण्यात आले असून आज या संयुक्त सरावास सुरुवात झाली. 8 ते 21 नोव्हेंबर या कालावधीत रंगणाऱया या संयुक्त लष्करी सरावामध्ये दहशतवाद विरोधी ऑपरेशन्स, शांतता अभियान आणि आपत्ती निवारण परिस्थितीसह लष्करी काwशल्यांची थरारक प्रात्यक्षिके सादर होणार आहेत.
पुण्यातील औंध येथील मिलिटरी स्टेशन येथे ‘ऑस्ट्राहिंद’ हा संयुक्त लष्करी सराव रंगणार आहे. हा लष्करी सराव दोन टप्प्यांमध्ये होणार असून यामध्ये हिंदुस्थान लष्कराची 140 जवानांची तुकडी सहभागी होणार असून डोग्रा रेजिमेंटची एक बटालियन आणि हवाई दलाचे 14 जवान तर ऑस्ट्रेलियन सैन्य दलाचे 120 जवान या सरावात प्रतिनिधित्व करणार आहेत.
z हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलियन सैन्यांतील परस्पर कार्यक्षमता वाढवणे, जागतिक आणि प्रादेशिक धोक्यांचा सामना करण्यासाठी संयुक्त ऑपरेशन्स सुलभ करणे, सामरिक पातळीवरील सहकार्य मजबूत करणे हे या सरावामागील उद्दिष्टय़ आहे.
दोन्ही देशांच्या संयुक्त सरावात दहशतवादविरोधी कारवाई, शांतता अभियान, संयुक्त ऑपरेशन, बॉम्ब शोध आणि नष्ट मिशन, आपत्ती निवारण मिशन, स्पेशल हेली बोर्न ऑपरेशन्स, लष्करी काwशल्यांची प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहेत.
सर्वेत्तम ऑपरेशन पद्धतींची देवाणघेवाण, लढाऊ रणनीतींचे प्रशिक्षण, जटिल, अपारंपरिक लष्करी ऑपरेशन्समध्ये एकत्र काम करण्याची क्षमता विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे.