जोगो हेल्‍थ आणि मायो क्लिनिकची हातमिळवणी, ट्रेमर्सकरिता प्रगत उपचार देणार

जोगो हेल्‍थ या न्‍यू जर्सी, USA येथे मुख्‍यालय असलेल्‍या प्रीस्क्रिप्‍शन डिजिटल थेरप्‍युटिक्‍स कंपनीने मायो क्लिनिकसोबत भागीदारीची घोषणा केली आहे. ज्‍याचा पार्किन्‍सन्‍स ट्रेमर्स, फंक्‍शनल ट्रेमर्स (एफटी) आणि एसेन्शियल ट्रेमर्स (ईटी) अशा विविध ट्रेमर्सना समजून घेण्‍यासोबत त्‍यावरील उपचार आधुनिक करण्‍याचा मनसुबा आहे. या नवीन सहयोगांतर्गत वैद्यकीय विश्‍लेषण आणि डिवाईस विकास कौशल्‍याला एकत्रित करत दोन्‍ही कंपन्‍या या स्थितींसाठी AI-संचालित डिजिटल थेरप्‍युटिक्‍समध्‍ये अग्रस्‍थानी राहण्‍याचा प्रयत्‍न करतील.

संयुक्‍त संशोधन हे विशेषत: फंक्‍शनल ट्रेमर्ससाठी विशेष उपचार विकसित करण्‍यावर लक्ष केंद्रित करण्यात यईल, जेथे सध्‍या गुणकारी वैद्यकीय थेरपी पर्यायांचा अभाव आहे. रूग्‍णांना कामावर किंवा शाळेमध्‍ये अधिक वेळ सुट्ट्या घ्‍याव्‍या लागतात. मायो क्लिनिकचा येथे उल्‍लेख करण्‍यात आलेल्‍या तंत्रज्ञानामध्‍ये आर्थिक हिस्‍सा आहे. जेथे रूग्‍ण केअर, शिक्षण व संशोधनाप्रती त्‍यांच्‍या ना-नफा तत्त्वावर आधारित कटिबद्धतेला अधिक प्रबळ करण्‍यासाठी प्राप्‍त करण्‍यात आलेल्‍या महसूलाचा वापर करण्यात येतो. हे सहयोगात्‍मक संशोधन सप्‍टेंबर 2024 मध्‍ये सुरू होणार आहे.

हिंदुस्थानातील न्‍यूरोलॉजिकल आजारांमध्‍ये ट्रेमर्ससह हालचालीसंदर्भात विकारांचे सर्वाधिक प्रमाण आहे. प्रशांत ईटी एएल यांच्‍या संशोधनानुसार हिंदुस्थानात ट्रेमर्सचे प्रमाण 7.7 टक्‍के आहे. जोगोने ईएमजी बायोफिडबॅकच्‍या विज्ञानाचा अवलंब करणारे पेटण्‍टेड एआय-संचालित वीअरेबल सेन्‍सर समाविष्‍ट केले, ज्‍यामुळे न्‍यूरोप्‍लॅस्टिसिटी सोपे झाले. जोगो नॉन-इन्‍व्‍हेसिव्‍ह, पोर्टेबल, वायरलेस डिजिटल डिवाईस आहे. ज्‍याला यूएस एफडीएकडून 510-के सूट देण्‍यात आली आहे. जोगो हेल्‍थ हिंदुस्थानातील दिल्‍ली, मुंबई, बेंगळुरू, चेन्‍नई व कोलकाता यासह 10 प्रमुख शहरांमध्‍ये कार्यरत आहे. जोगो क्लिनिक, चेन्‍नई (अद्यार) हे जगातील पहिले जेसीआय अॅक्रेडिटेड कॉम्‍प्रेहेन्सिव्‍ह रिहॅब सेंटर आहे. जोगो हेल्‍थचा 2025 पर्यंत 20 शहरांपर्यंत आपल्‍या सेवा विस्‍तारित करण्‍याचा मनसुबा आहे.