विमानतळावर तासन्तास विमानाची वाट पाहणे फार कंटाळवाणे असते. लॉबीमध्ये बसून अन्य प्रवाशांचे चेहरे पाहत बसावे लागते. अशातच जोधपूर विमानतळावर एक हटके प्रसंग घडला. जोधपूर विमानतळावर वाट पाहणाऱ्या प्रवाशांसाठी सीआयएसएफच्या जवानांनी कमालच केली. सीआयएसएफच्या जवानांनी भल्या सकाळी प्रवाशांना व्यायाम करायला लावले. बोर्डिंगच्या आधी प्रवाशांना फिट केले. प्रवासात शरीरावर ताण पडू नये, शरीर शिथिल व्हावे म्हणून जवानांनी प्रवाशांना सोबत घेऊन व्यायाम सुरू केला. एका प्रवाशाने सोशल मीडियावर हा व्हिडीओ अपलोड केला.
उत्तरेकडील वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर अनेक विमानतळांवर हे रुटीन सुरू आहे. धुक्यामुळे विमानांच्या उड्डाणाला विलंब होत आहे. त्यामुळे प्रवाशांना वेटिंगवर जावे लागत आहे. अशातच सीएसआयएफचे जवान असा उपक्रम राबवत आहेत.