महाराष्ट्र, तामीळनाडू, गुजरात, कर्नाटक व हरयाणा ही जास्त रोजगार देणारी राज्ये आहेत; परंतु या राज्यांतही नोकऱयांत घट झाली.
पेंद्रात भाजपचे सरकार आणि राज्यात मिंधेंचे सरकार आल्यापासून बेरोजगारी मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. डिग्री हातात असूनही तरुणांना नोकरी मिळत नाही. त्यांच्यावर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. कर्मचारी भविष्य निधी संस्थेच्या ईपीएफओने नुकताच अहवाल सादर केला असून यात सर्वात जास्त बेरोजगार तरुणांची संख्या महाराष्ट्रात असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. महाराष्ट्रातील खासगी नोकऱयांमध्ये सर्वात जास्त 19 टक्के घटल्या आहेत. तसेच देशात 7 लाख तर एकटय़ा महाराष्ट्रात 5.84 लाख रोजगार कमी झाले आहेत. ईपीएफओचा अहवाल 2023-24 मध्ये खासगी क्षेत्रातील 7 लाख नोकऱयांत घट झाल्याचा दावा करण्यात आला आहे. गेल्या पाच वर्षांत नोकऱयांतील ही सर्वात मोठी घट आहे, असेही या अहवालात म्हटले आहे. कोविड काळात 2020-21 मध्येही नोकऱयांत वार्षिक आधारे एक लाखाची घट होती. महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात, कर्नाटक व हरियाणा ही जास्त रोजगार देणारे राज्ये आहेत. परंतु इथेही नोकऱ्यांत घट झाली आहे. महाराष्ट्रात 2022-23 मध्ये 30.29 लाख नोकऱया होत्या तर 2023- 24 मध्ये त्या 24.45 लाखांपर्यंत म्हणजे 5.84 लाख (19 टक्के) घटल्या आहेत, असे या अहवालातून समोर आले आहे.
पहिली नोकरी नाही अन् दुसरीही नाही
मध्य व उच्च पातळीवरील नोकऱ्याही 2023-24 मध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 25 टक्क्यांनी घटल्या आहेत. देशातील कंपन्या आता जुन्या कर्मचाऱ्यांची निवृत्ती किंवा नोकरी सोडल्यानंतर रिक्त जागा भरत नाहीत. आहे त्या कर्मचाऱयांकडून अतिरिक्त कामे करून घेतली जात आहेत. तसेच जनरेटिव्ह एआय, ऑटोमेशन, रोबोटिकमुळे कर्मचाऱ्यांसमोर आव्हाने आहेत.
महाराष्ट्रात फ्रेशर्सच्या नोकऱ्यांही घटल्या
वर्षाला दोन कोटी नोकऱ्या उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन मोदी सरकारने निवडणूकपूर्व दिले होते. परंतु, आता केंद्र सरकार या नोकऱ्याबद्दल काहीच बोलत नाही. या नोकऱ्यांचा त्यांना विसर पडला आहे. कोविड काळानंतर फ्रेशर्सच्या नोकऱयांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र दिसत होते. परंतु आता मात्र नेमके उलट झाले आहे. नोकऱ्यांमध्ये घट होत आहे. 2022-23 मध्ये 1.14 कोटी नोकऱ्या नवख्या उमेदवारांना मिळाल्या होत्या. 2023-24 मध्ये त्यात घट होऊन ही संख्या 1.09 कोटी एवढी राहिली.
मोदींच्या चुकीच्या धोरणांचा फटका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चुकीच्या धोरणांनी देशातील छोटे उद्योग धंदे अक्षरशः उद्ध्वस्त केले, अशा शब्दांत काँग्रेसने एनडीए सरकारवर घणाघाती टीका केली आहे. सरकारने उद्योग धंदे बर्बाद करून तरुणांना बेरोजगारीच्या दलदलीत ढकलले. परंतु, मोदींना तरुणांच्या समस्यांशी, दुःखाशी काही देणेघेणे नाही. ते केवळ त्यांचे आयुष्य मजेत जगत आहेत, असे काँग्रेसने म्हटले आहे.