स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) मध्ये प्रोबेशनरी ऑफिसरच्या 600 पदांसाठी भरती आजपासून सुरू करण्यात आली आहे. या पदांमधील 586 पदे नियमित तर 14 पदे अनुशेषासाठी राखीव आहेत. या पदांसाठी पूर्वपरीक्षा 8 आणि 15 मार्च रोजी होणार आहे. उमेदवार किमान पदवी उत्तीर्ण आवश्यक असून त्याचे वय 21 ते 30 वर्षांपर्यंत असायला हवे.