मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची संधी

मुंबई उच्च न्यायालयात मुख्य संपादक, संपादक, उपसंपादक, सहाय्यक संपादक या पदांच्या एकूण 13 रिक्त जागांसाठी भरती केली जात आहे. इच्छुक उमेदवारांनी त्यांचा ऑनलाइन अर्ज 31 डिसेंबर 2024 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत भरायचे आहेत. या पदभरतीत अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 60 हजार ते दीड लाखापर्यंत पगार दिला जाणार आहे.