चीनमध्ये मृतदेहाजवळ बसणाऱयास 25 हजार पगार

चीनमधील एक कंपनी मृतदेहाजवळ 10 मिनिटे बसणाऱ्यास 25 हजार रुपये इतके मानधन देत आहे. यासाठी इच्छुकांना एक चाचणी देणे अनिवार्य आहे. अलीकडेच या कामाची जाहीरात प्रसिद्ध झाली अन् त्याची सर्वत्र चर्चा रंगली. या नोकरीसाठी अर्जदाराला अत्यंत थंड वातावरणात मृतदेहाजवळ 10 मिनिटे बसावे लागेल.

रुशान झिनमाइक ह्यूमन्स रिसोर्स कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीने ही अनोखी ऑफर जारी केली आहे. नोकरीसाठी पात्र असलेल्या 45 वर्षांपर्यंतच्या तरुणांची मानसिक आणि शारीरिक चाचणी घेतली जाईल. 24 तासांच्या शिफ्टमध्ये हे काम असेल.

अर्जदाराची पार्श्वभूमी तपासणी, वैद्यकीय तपासणी आणि त्यानंतर मुलाखत घेतली जाईल. तसेच नोकरी मिळाल्यानंतर पहिले 6 महिने भाडेतत्त्वावर काम करावे लागेल. त्यानंतर गुणवत्तेच्या आधारावर कायम केले जाईल. दरम्यान, या नोकरीसाठी अर्ज करणाऱयांना 853 रुपये मोजावे लागतील, तर रुशान येथील इच्छुकांना मोफत अर्ज करता येईल, असे जाहीरातीत नमूद आहे. 25 हजार रुपयांच्या वेतनाशिवाय नाइट शिफ्ट करणाऱ्यांना अतिरिक्त पैसे दिले जाणार आहेत.