जम्मू आणि कश्मीरमधील पायाभूत सुविधांच्या विकासाचा कलम 370 रद्द करण्याशी संबंध नाही: ओमर अब्दुल्ला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू आणि कश्मीरमधील गंदरबल येथे झेड-मोर बोगद्याचे उद्घाटन केले. गंदरबल जिल्ह्यातील गगनगीर आणि सोनमर्गला जोडणारा 6.5 किमी लांबीचा हा दुहेरी बोगदा आहे. या बोगद्याच्या उद्धाटनावेळी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला देखील उपस्थित होते.

या विकास कामांच्या संदर्भात बोलताना ओमर अब्दुला म्हणाले की, कश्मीर खोऱ्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाचा कलम 370 रद्द करण्याशी काहीही संबंध नाही. इंडिया टुडेसोबत बोलताना अब्दुल्ला पुढे म्हणाले की, कलम 370 रद्द केल्याशिवाय जम्मू आणि कश्मीरमधील पायाभूत सुविधांचे प्रकल्प पूर्ण होऊ शकले असते.