
सोसायटी ऑफ अमेरिकन गॅस्ट्रोइंटेस्टेनेल अँड इंडॉस्काॅपी सर्जन या सर्जिकल संस्थेने अमेरिकेतील लॉस एंजलिस येथे वार्षिक परिषदेमध्ये जेजे रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयातील दोन सर्जिकल व्हिडिओना एस पोडियम स्पर्धेत पहिले आणि तिसरे स्थान पटकावले. तर ग्रँड मेडिकल महाविद्यालयाने सर्वाधिक व्हिडिओ सादरीकरण केले आणि स्वीकृती मिळवण्याचा मान मिळवला. ही कामगिरी केल्याबद्दल संघाचे नेतृत्व करणारे जेजे रुग्णालयाचे अधिष्ठाता प्राध्यापक डॉ. अजय भंडारवार आणि डॉ. गिरीश बक्षी, डॉ.वरुण दत्तानी आणि डॉ. मनीष हांडे यांचा सत्कार शिवसेनेचे माजी नगरसेवक अनिल कोकीळ यांच्या हस्ते झाले. यावेळी उपशाखाप्रमुख शंकर लंबाडे, उमेश अधिकारी, मंगेश चव्हाण, प्रीतम दादरकर, मधुसूदन आमरे उपस्थित होते.