मराठा आंदोलक आक्रमक झाल्यामुळे सरकारने नमते घेत मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या सर्वच मागण्या मान्य केल्या. कुणबी नोंदी सापडलेल्या 57 लाख मराठय़ांना ओबीसी प्रमाणपत्र देण्याचे मान्य करत सरकारने कुणबी नोंदी असलेल्या मराठय़ांच्या सग्यासोयऱयांनाही ओबीसी सवलतींचा लाभ देण्याची घोषणा सरकारने केली.
मात्र या निर्णयामुळे ओबीसी नेते नाराज झाले आहेत. त्यामुळे या आरक्षणावरून सरकारने ओबीसी व मराठा दोन्ही समाजांना अस्वस्थ केलं आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारा जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
या सरकारने कट करून ओबीसी आणि मराठा यांच्यात दोघांनाही अस्वस्थ करून टाकले, हेच त्यांचे यश आहे.
हे सरकार असंवेदनशील आहे. त्यांना जनतेच्या, समाजाच्या भावनांशी काही देणेघेणे नाही.#maratha_Reservation #obc— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 28, 2024
”या सरकारने कट करून ओबीसी आणि मराठा यांच्यात दोघांनाही अस्वस्थ करून टाकले, हेच त्यांचे यश आहे. हे सरकार असंवेदनशील आहे. त्यांना जनतेच्या, समाजाच्या भावनांशी काही देणेघेणे नाही”, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.