परभणीप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करा; जितेंद्र आव्हाड यांची मागणी

परभणीत झालेल्या संविधान प्रतिनेच्या विटंबनेच्या घटनेने हिंसाचार उसळला. त्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या सोमनाथ सुर्यवंशी यांचा कारागृहातच मृत्यू झाला. या घटनेनंतर वातावरण तापले असून या घटनेवर विरोधक सरकारवर टीका करत आहे. तसेच सर्व स्तरातून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची माहणी केली आहे.

या बाबत एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे की, परभणी येथे आंबेडकरी कार्यकर्त्यांना पोलिसांनी अमानुष मारहाण केली. या मारहाणीत पोलीस कोठडीत सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा मृत्यू झाला. सोबत शवविच्छेदनाचा अहवाल जोडत आहे. सोमनाथ यास बेदम मारहाण झाली. त्यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचा अहवाल जिल्हा रुग्णालयाने दिला आहे. हा अहवाल हातात आल्यानंतर लगेचच कारवाई करणे गरजेचे होते. मात्र, सरकारने भूमिका घेतली नाही. या माध्यमातून मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की, सरकारने संबधित पोलीस अधीक्षक, संबधीत पोलीस उपअधीक्षक, पोलीस अधिकारी, ठाणे अंमलदार आणि त्या पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांवर तातडीने निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी आव्हाड यांनी पोस्टमधून केली आहे.

या पोस्टसोबत त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी याचा शवविच्छेदनाचा अहवलाही जोडला आहे. त्यात सोमनाथला बेदम मारहाण झाल्यानेच त्याचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. या अहवालांनंतर तातडीने कार्यवाही करणे आवश्यक होते. मात्र, सरकारने भूमिका घेतली नाही. आता त्यांनी एक्स पोस्टद्वारे मुख्यमंत्र्यांना कारवाई करण्याची विनंती केली आहे. सरकारने संबधित पोलीस अधीक्षक, संबधीत पोलीस उपअधीक्षक, पोलीस अधिकारी, ठाणे अंमलदार आणि त्या पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांवर तातडीने निलंबनाची कारवाई करावी, असे आव्हाड यांनी म्हटले आहे.