मुंबई आणि पुणे मेट्रोसाठी सरकारने निधी जाहीर केला आहे. पण जाहीर झालेल्या निधीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितलेल्या आकड्यांत तफावत आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. तसेच खरं काय ते सांगा असेही आव्हाड म्हणाले.
एक्सवर पोस्ट करून जितेंद्र आव्हाड म्हणाले की, खरे काय ते सांगा??? मुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री यांच्या आकड्यात तफावत, मुख्यमंत्री यांनी दिलेल्या आकडेवारी नुसार MUTP प्रकल्पांसाठी 511.48 कोटी मिळाले. तर अर्थ मंत्री अजित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार MUTP 3 साठी 1465 कोटी 33 लाख रुपये मिळाले. मुंबई मेट्रो साठी 1255 कोटी मिळाले असे मुख्यमंत्री यांनी सांगितले. तर दादांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई मेट्रो साठी 1673 कोटी 41 लाख देण्यात आलेत. पुणे मेट्रो साठी 699 कोटी मिळाले असे मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे. तर पुणे मेट्रो साठी 837 कोटी मिळाल्याचे दादांनी सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांच्या आकडेवारी नुसार इंटिग्रेटेड ग्रीन अर्बन मोबिलिटी प्रकल्प मुंबई साठी 792.35 कोटी मिळाले.तर यासाठी अजित पवार यांच्या आकडेवारीनुसार 652 कोटी 52 लाख मिळाले. नेमके किती पैसे देण्यात आले आहेत असा सवाल आव्हाड यांनी विचारला.
खरे काय ते सांगा???
मुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री यांच्या आकड्यात तफावत
मुख्यमंत्री यांनी दिलेल्या आकडेवारी नुसार MUTP प्रकल्पांसाठी 511.48 कोटी मिळाले
तर अर्थ मंत्री अजित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार MUTP 3 साठी 1465 कोटी 33 लाख रुपये मिळालेमुंबई मेट्रो साठी 1255…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 2, 2025