जिओस्टार 1100 कर्मचाऱ्यांना कामांवरून काढणार

गेल्या काही महिन्यांपासून टेक आणि अन्य कंपन्यांमध्ये नोकर कपात करण्याचा जो ट्रेंड सुरू झाला, तो आात जिओ स्टारपर्यंत पोहोचला आहे. जिओस्टार आपल्या 1100 कर्मचाऱ्यांना कामांवरून काढून टाकणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांना कामांवरून काढून टाकले जाईल, त्या कर्मचाऱ्यांना 6 महिने किंवा 1 वर्षाचा पगार दिला जाणार आहे. जर एखादा कर्मचारी वर्षभरापूर्वी रुजू झाला असेल तर त्याला एक महिन्याचा पूर्ण पगार दिला जाणार आहे. डिस्ने स्टार इंडिया आणि रिलायन्स व्हायकॉम 18 चे विलिनिकरण गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झाले होते. जिओकडे सध्या दोन ओटीटी आणि 120 चॅनेलसह 75 कोटी यूजर्स आहेत.