रिलायन्स जिओने नव्या वर्षाच्या सुरुवातीला ग्राहकांना जोरदार झटका दिला आहे. कंपनीने आपल्या 199 रुपयांच्या पोस्टपेड प्लानची किंमत 100 रुपयांनी वाढवली आहे. त्यामुळे जिओचा हा प्लान आता 299 रुपयांना झाला आहे. या प्लानची नवी किंमत 23 जानेवारीपासून लागू होणार आहे. या प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंग, 25 जीबी हायस्पीड डेटा, रोज 100 फ्री एसएमएस आणि देशात रोमिंगसारखी सुविधा मिळते, परंतु 199 रुपयांच्या प्लानसाठी आता जिओच्या ग्राहकांना 299 रुपये मोजावे लागतील.