रिचार्ज महागले, सिम पोर्टेबिलिटीवर उड्या

देशभरात 3 जुलै रोजी कंपन्यांनी रिचार्ज प्लॅन महाग केले. त्यानंतर प्रत्येक जण मोबाईल सिमची सेवा बदलू लागला असून सध्याच्या घडीला नंबर पोर्टेबिलिटीचा विक्रम मोडीत निघाला. खासगी कंपन्यांना ग्राहकांनी अशाप्रकारे चपराक लगावली आहे. मोबाईल नेटवर्क सेवा पुरवठादार जिओ, एअरटेल, व्होडाफोन-आयडिया रिचार्ज प्लॅन महाग केला. त्याविरोधात देशभरातील ग्राहकांनी संताप व्यक्त केला. या दरवाढीचा निषेध म्हणून ग्राहकांनी बीएसएनएलकडे मोबाईल नंबर पोर्ट केले. बीएसएनएलकडे ग्राहकांची रीघ लागली आहे.

– भारतीय दूरसंचार विभागाने मोबाईल युझर्सला विनाक्रमांक बदलता नेटवर्क पुरवठादार बदलण्याची सुविधा दिली आहे. म्हणजे ग्राहक जिओचे सिम वापरत असेल तर त्याला त्याच्या आवडीनुसार, दुसऱ्या कंपनीची सेवा घेता येते. त्याला दूरसंचार पुरवठादार बदलता येतो.