जिंदाल पोर्ट कंपनीत झालेल्या वायुगळतीमुळे बाधित झालेल्या विद्यार्थ्यांना जिल्हा रुग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आले होते.त्यापैकी 12 विद्यार्थ्यांची प्रकृती पुन्हा बिघडली. विद्यार्थ्यांना त्रास होऊ लागल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
12 डिसेंबर रोजी जिंदाल पोर्ट कंपनीत एलपीजी वायुगळती झाली.कंपनीच्या शेजारीच असलेल्या माध्यमिक विद्यामंदिर जयगड शाळेतील 68 विद्यार्थ्यांना त्रास झाला.विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.दोन दिवसांनी या विद्यार्थ्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
उपचार घेऊन विद्यार्थी घरी परतल्यानंतर त्यांना पुन्हा त्रास होऊ लागला.काही विद्यार्थ्यांच्या छातीत दुखू लागले तर काहींच्या पोटात दुखत होते.अशा 12 विद्यार्थ्यांना पुन्हा खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.