अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांचे जॉर्जिया येथील घरी कर्करोगाने निधन झाले. ते cवर्षांचे होते. जिमी कार्टर यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. अमेरिकेच्या इतिहासात सर्वाधिक काळ जगणारे ते राष्ट्राध्यक्ष आहेत. 2002 मध्ये त्यांना शांततेच्या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. कार्टर 1977 ते 1981 पर्यंत अमेरिकेचे 39 वे राष्ट्राध्यक्ष राहिले.
कार्टर गेल्या काही काळापासून मेलानोमा या आजाराने ग्रस्त होते. हा एकप्रकारचा त्वचेचा कर्करोग आहे. हा कर्करोग त्यांच्या यकृत आणि मेंदूपर्यंत पसरला होता. त्यातच त्यांचे निधन झाले. 2023 मध्ये त्यांनी हॉस्पिस केयरच्या माध्यमातून उपचार करून घेण्याचा निर्णय घेतला. म्हणजेच त्यांनी रुग्णालयात उपचार घेण्यास नकार दिला. त्यामुळे काही नार्ंसग स्टाफ आणि कुटुंबियांद्वारे त्यांची घरीच काळजी घेतली जात होती.
- राष्ट्राध्यक्ष पद सोडल्यानंतर त्यांनी अनेक वर्षे आपली संस्था कार्टर सेंटरच्या माध्यमातून समाजोपयोगी, मानवतावादी कामे केली. त्यांच्या या समाजकार्यासाठी त्यांना 2002 मध्ये त्यांना शांततेच्या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
- केवळ माझ्यासाठीच नाही तर त्या सर्व लोकांसाठी जिमी कार्टर हे हीरो होते जे शांतता, मानवाधिकार आणि निस्वार्थ प्रेमात विश्वास ठेवतात. ते लोकांमध्ये असायचे त्यामुळे आज संपुर्ण जग त्यांचे कुटुंब बनले अशी प्रतिक्रिया त्यांचे पुत्र चिप कार्टर यांनी दिली.
- जिमी कार्टर यांचा जन्म 1 ऑक्टेबर 1924 रोजी शेतकरी कुटुंबात झाला होता. 1960 मध्ये ते राजकारणात आले आणि 1971 मध्ये ते पहिल्यांदा गव्हर्नर बनले. त्यानंतर 6 वर्षांनी त्यांनी रिपब्लिकन पार्टीचे प्रमुख जेराल्ड पर्ह्ड यांचा पराभव केला आणि राष्ट्राध्यक्ष बनले.
राष्ट्राध्यक्ष असताना जिमी कार्टर यांनी अनेक आव्हानांचा धैर्याने सामना केला. जीवनमान सुधारण्यासाठी त्यांनी संपूर्ण ताकद पणाला लावली. त्यांच्या राजकीय विचारांशी असहमत होतो, परंतु त्यांना देशाप्रती आणि येथील परंपरांप्रती प्रचंड प्रेम होते. त्यामुळे त्यांच्याबद्दल माझ्या मनात कायम आदर राहील. – डोनाल्ड ट्रम्प, राष्ट्राध्यक्ष, अमेरिका
अमेरिका आणि जगातील असामान्य नेता, राजकीय नेता आणि मानवतावादाचा पुरस्कर्ता गमावला. सहा दशक ते माझे अत्यंत जवळचे मित्र राहिले. अमेरिकेसह जगभरातील लोक त्यांना आपला जवळचा मित्रच मानतात. त्यांनी अनेक आर्थिक सुधारणा केल्या. – जो बायडेन, माजी राष्ट्राध्यक्ष, अमेरिका
हरयाणातील कार्टरपुरी गावावर शोककळा
जिमी कार्टर यांच्या नावावरून हरयाणातील एका गावाचे नाव कार्टरपुरी ठेवण्यात आले. कार्टर यांच्या निधनामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली. 1978 मध्ये कार्टर गुरुग्राम येथे आले होते तेव्हा त्यांच्या नावावरून दौलतपूर नसीराबादचे नाव बदलून कार्टरपुरी ठेवण्यात आले होते. कार्टर हे गुरुग्राम येथे आले होते तेव्हा कार्टरपुरी गावात उत्सवाचे वातावरण होते. संपूर्ण गाव एखाद्या नववधूसारखे सजवण्यात आले होते. पारंपारिक पद्धतीने त्यांचे गावात स्वागत करण्यात आले. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्टर यांची आई मुंबईतील एका रुग्णालयात नर्स होती. दुसऱया जागतिक महायुद्धादरम्यान लष्करातील जवानांना वैद्यकीय सेवा देण्यासाठी त्या नसीराबाद येथे आल्या होत्या. येथे त्या जेलदारच्या हवेलीत राहत होत्या. याच ठिकाणी जिमी कार्टर यांचा जन्म झाला. त्यांच्या आईच्या सांगण्यावरूनच त्यांनी त्यांच्या जन्मगावाला भेट दिली होती. त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी दौलतपूर नसीराबादचे नाव बदलून कार्टरपुरी केले.