महर्षी दयानंद महाविद्यालय आयोजित 42 व्या आंतर महाविद्यालयीन खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात झुनझुनवाला महाविद्यालयाने तर मुलांच्या गटात एस. एस. टी. महाविद्यालयाने अजिंक्यपद संपादले. लालबागच्या पेरू कंपाऊंडमध्ये पार पडलेल्या स्पर्धेत मुलांच्या अंतिम सामन्यात झुनझुनवाला महाविद्यालयाने डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचा 2.40 मि. राखून 12-11 असा एक गुणाने पराभव केला. या सामन्यात झूनझुनवालाच्या प्रथमेश दुर्गावले, सदाशिव पालव, धिरज भावे यांनी दमदार खेळ करत संघाला अजिंक्यपद मिळवून दिले.
मुलींच्या अजिंक्यपदाच्या लढतीत एस. एस. टी. महाविद्यालयाने एस.एन.डी.टी. महाविद्यालयाचा 14-06 असा 8 गुणांनी धुव्वा उडवत विजेतेपद मिळवले. या सामन्यात एस. एस. टी. च्या कल्याणी कंक (2 मि. संरक्षण व 5 गुण), मीना कांबळे (1 मि. संरक्षण व 1 गुण), काजल शेख (नाबाद 3.30 मि. संरक्षण व 4 गुण), किशोरी मोकाशी (2 मि. संरक्षण व 2 गुण) यांनी चमकदार करत एसएनडीटीच्या मुलींना संघर्ष करण्याची संधीच मिळू दिली नाही.