झारखंडमध्ये 8 नक्षलवाद्यांचा खात्मा

बोकारो येथे आज सकाळी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत आठ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यता आला. लुगू आणि झुमरा टेकडय़ांदरम्यान जंगलात ही चकमक उडाली. नक्षलवाद्यांच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत सुरक्षा दलाच्या जवानांनी नक्षलवाद्यांना ठार केले. दरम्यान, घटनास्थळावरून मोठय़ा प्रमाणावर शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. 1 कोटी रुपयांचे बक्षीस असलेला विवेक हा नक्षलवादीही चकमकीत मारला गेल्याची माहिती झारखंडच्या पोलीस महासंचालकांनी दिली. केंद्रीय राखीव पोलीस दल आणि पोलिसांनी संयुक्तरीत्या ही कारवाई केली. दरम्यान, छत्तीसगडमधील विजापूर जिह्यात झालेल्या आयईडी स्फोटात मनोज पुजारी (26) हा जवान शहीद झाला.