झारखंड मुक्ती मोर्चा आणि कॉँग्रेस 70 जागा लढवणार 

झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीच्या मित्रपक्षांमध्ये जागावाटप निश्चित झाले आहे. विधानसभेच्या 81 जागांपैकी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वातील झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस 70 जागांवर निवडणूक लढवणार आहे. याशिवाय उर्वरित जागांवर आरजेडी, सीपीएम आणि इतर मित्र पक्ष निवडणूक लढवतील, इंडिआ आघाडीच्या घटक पक्षांशी चर्चा सुरू असून कोण कोणत्या जागा लढवणार हे लचकरच स्पष्ट होईल, असे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सांगितले.

झारखंड भाजपची उमेदवारी यादी जाहीर

झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने 66 उमेदवारांची पहिली यादी शनिवारी जाहीर केली. झारखंड मुक्क्ती मोर्चाचे नेते माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांना सरायकेलामधून उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय माजी मुख्यमंत्री मधु कोडा यांच्या पत्नी गीता कोडा यांना जगन्नाथपूरमधून, अर्जुन मुंडा यांच्या पत्नी मीरा मुंडा यांना पोटकामधून तिकीट देण्यात आले आहे. माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी यांना धनवरमधून तर मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या मेहुणी सीता सोरेन यांना भाजपने जामतारा येथून तिकीट दिली आहे