झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर अंमलबजावणी संचलनालयाने त्यांना अटक केली आहे. सोरेन यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या मंत्रीमंडळातील वाहतूक मंत्री चंपाई सोरेन यांची मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली आहे.
हेमंत सोरेन यांनी ईडी अधिकाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. सोरेन यांनी एसटी-एससी कायद्यांतर्गत ही तक्रार दाखल केली आहे. मला आणि माझ्या समुदायाला बदनाम करण्यासाठी आणि मानसीक छळ करण्यासाठी ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापेमारीची कारवाई केली, असे सोरेन यांच्याकडून एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे. दिल्लीत ईडीच्या अधिकाऱ्यांनी टाकलेल्या छाप्याविरोधात त्यांनी हा एफआयआर दाखल केला आहे.