झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला आहे. 43 मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत महिलांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतल्याचे सत्ताधारी पक्ष झारखंड मुक्ती मोर्चाने म्हटले आहे. अनूसुचित जमातींसाठी आरक्षित असलेल्या जागांवर महिला मतदारांचा उत्साह चांगलाच होता.
तर दुसरीकडे खुल्या प्रवर्गातील जागांवर मतदानाचे स्वरूप सामान्य राहिलेले आहे. असे असले तरी या जागांवर महिला मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान केले आहे. मईया सन्मान योजना आणि सर्वजन पेन्शन योजनेमुळे महिला मतदारांचे प्रमाण वाढल्याचे झारखंड मुक्ती मोर्चाने म्हटले आहे.
झारखंड मुक्ती मोर्चा सरकारच्या योजनांमुळे मतदारांनी मतदानात मोठा उत्साह दाखवला आहे. मईया सन्मान योजना, सर्वजन पेन्शन योजना, शेतकरी कर्जमाफी, वीज बिल माफी, मोफत वीज योजनेमुळे मतदार वाढल्याचा दावाही करण्यात आला आहे.