Assembly election 2024 – पहिली यादी जाहीर होताच भाजपला गळती; आजी-माजी आमदारासह अनेक नेत्यांचा रामराम

देशात सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. जम्मू-कश्मीर, हरियाणानंतर आता महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणूक लागली आहे. दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्षाने आपली पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपने महाराष्ट्रात 99, तर झारखंडमध्ये 66 उमेदवारांची यादी जाहीर केली. मात्र यानंतर भाजपला गळती लागली आहे. एक-एक करून भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम करण्यास सुरुवात केली आहे.

सरायकेला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढलेल्या गणेश महली यांनी पक्षाला रामराम केला आहे. झारखंड मुक्ती मोर्चाकडून त्यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी पक्ष नेतृत्वावर जोरदार टीका केली. भाजप आता पहिल्यासारखा पक्ष राहिला नसल्याचे ते म्हणाले.

गणेश महली यांनी भाजप नेतृत्वासह चंपई सोरेन यांच्यावरही निशाणा साधला. चंपई सोरेन यांनी दिल्ली गाठत आमच्या मार्गात अडथळा निर्माण केला. त्याचे परिणाम येत्या काही दिवसात नक्कीच दिसून येतील, असा इशारा गणेश महली यांनी दिला.

दरम्यान, गणेश महली यांच्यासोबत अलावा पोटका विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार मेनका सरदार यांनीही भाजपची साथ सोडला असून सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. यासह जमुआचे विद्यामान आमदार केदारा हाजरा यांनीही पक्ष भाजपला रामराम केला.

भाजपमध्ये नाराजीनाट्य रंगणार? उमेदवारीबाबत साशंकता असल्याने इच्छुकांचे टेन्शन वाढले

81 जागांसाठी दोन टप्प्यात मतदान

झारखंडमध्ये 81 जागांसाठी दोन टप्प्यात निवडणूक होत आहे. 13 नोव्हेंबरला 43, तर 20 नोव्हेंबरला 38 जागांसाठी मतदान होईल. तर 23 नोव्हेंबर रोजी निकाल लागेल. तत्पूर्वी शनिवारी भाजपने 66 उमेदवारांची यादी जाहीर केली. दुसरीकडे आरजेडी, काँग्रेस, झारखंड मुक्ती मोर्चामध्ये अजूनही जागावाटपावरून मतभेद सुरू आहेत.

महायुतीतील संघर्ष सुरूच; रत्नागिरी-संगमेश्वरमध्ये भाजपच्या माजी आमदाराची आक्रमक भूमिका