
एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. झाशीहून प्रयागराज येथे महाकुंभसाठी जाणाऱ्या विशेष ट्रेनवर मध्य प्रदेशातील हरपालपूर रेल्वे स्थानकावर हल्लेखोरांनी हल्ला केल्याचे वृत्त समोर आले आहे. हल्लेखोरांनी यावेळी रेल्वेवर दगडफेक आणि ट्रेनची तोडफोडही केल्याचे वृत्त आहे .या घटनेने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली असून भितीचे वातावरण पसरले आहे.
झाशीहून प्रयागराजला जाणाऱ्या ट्रेनवर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. झाशीहून प्रयागराज महाकुंभला जाणाऱ्या विशेष ट्रेनवर हल्लेखोरांनी हल्ला केल्याचे वृत्त आहे. हल्लेखोरांनी यावेळी रेल्वेवर दगडफेक आणि ट्रेनची तोडफोडही केल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे प्रकरण झाशी विभागातील हरपालपूर स्टेशनचे आहे. हल्ल्यादरम्यान रेल्वेच्या बोगीतून प्रवास करणारे प्रवासी घाबरले होते. यावेळी हल्लेखोरांनी ट्रेनमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला आणि ट्रेनचे दरवाजे आणि खिडक्याही तोडल्या आहेत.