
ऍमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांनी त्यांचा सिएटलमधील बंगला तब्बल 525 कोटी रुपयांना विकला आहे. हा बंगला विकल्यानंतर बेजोस आता मियामीला स्थलांतरित झाले आहेत. बेजोस आता आपली प्रेयसी लॉरेन सांचेजसोबत या नव्या घरात राहणार आहेत. मियामीमधील बंगला हा 237 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच जवळपास 2 हजार कोटी रुपये किमतीचा आहे. सिएटलमधील त्यांचा बंगला वॉशिंग्टन राज्यातील आतापर्यंत विकला गेलेला सर्वात महागडा बंगला ठरला आहे. हा बंगला कायन इन्व्हेस्टमेंट एलएलसी कंपनीला विकण्यात आला आहे.