JEE Mains Result 2025 – जेईई मेन्सचा निकाल जाहीर; 24 विद्यार्थी अव्वल

JEE Mains सत्र 2 चा निकाल 2025 jeemain.nta.ac.in, nta.ac.in वर जाहीर करण्यात आला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने संयुक्त प्रवेश परीक्षा सत्र 2 (JEE Mains सत्र 2 निकाल) चा निकाल जाहीर केला आहे. परीक्षेत बसलेले उमेदवार jeemain.nta.ac.in, nta.ac.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचा निकाल तपासू शकतात.

जेईई मेन्स सत्र 1 पेपर 1 (बी.ई. / बी.टेक) परीक्षा 22, 23, 24, 28 आणि 29 जानेवारी 2025 रोजी घेण्यात आली होती. तर सत्र 2ची परीक्षा 2,3,4,7 आणि 8 एप्रिल रोजी घेण्यात आल्या होत्या. ही परीक्षा 13 भाषांमध्ये घेण्यात आली. त्यात हिंदी, इंग्रजी, बंगाली, गुजराती, आसामी, कन्नड, मल्याळम, मराठी, उडिया, पंजाबी, तमिळ, तेलगू आणि उर्दू या भाषांचा समावेश होता. आता या परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत.

जेईई मेन सत्र 2 च्या परीक्षेत एकूण 24 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवून अव्वल स्थान पटकावले आहे. 24 टॉपर्समध्ये राजस्थानचे 7, तेलंगणाचे 3, महाराष्ट्राचे 3, उत्तर प्रदेशचे 3, पश्चिम बंगालचे 2, आंध्र प्रदेशचे 1, दिल्लीचे 2, कर्नाटकचे 1 आणि गुजरातचे 2 आहेत.

जेईई मेन्स सत्र 2 चा निकाल असा तपासा
सर्वप्रथम jeemain.nta.ac.in वर जा.
होमपेजवर, पेपर 1 (बी.ई. / बी.टेक.) च्या संयुक्त प्रवेश परीक्षेसाठी निकालाची घोषणा/एनटीए स्कोअर [जेईई(मुख्य) – २०२५] वर क्लिक करा.
तुमचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड येथे प्रविष्ट करा.
निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
खालील डाउनलोड वर क्लिक करून स्कोअर कार्ड तुमच्या डेस्कटॉपवर सेव्ह करा.