मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मुख्य आरोपी जयदीप आपटे व तांत्रिक सल्लागार चेतन पाटील या दोघांना मालवण दिवाणी न्यायालयाने 10 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. मालवण दिवाणी न्यायालयाने आज जयदीप आपटेच्या न्यायालयीन कोठडीत 24 सप्टेंबरपर्यंत वाढ केली आहे. तर चेतन पाटीलचा सावंतवाडी जेलमधील मुक्काम वाढवण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडल्यानंतर जयदीप आपटे हा 26 ऑगस्टला फरार झाला होता. त्याच्याविरोधात सिंधुदुर्ग पोलिसांनी लूक आऊट नोटीस जारी केली होती. पोलिसांची सात पथके त्याचा शोध घेत होती. अखेर 4 सप्टेंबरला रात्री कल्याणच्या घरातून त्याला अटक करून गुरुवारी सकाळी मालवण पोलीस ठाण्यात आणून सिंधुदुर्ग पोलिसांकडे ताबा देण्यात आला होता.