
‘जाट’ चित्रपटात ख्रिश्चन समाजाबाबत केलेल्या वादग्रस्त आणि आक्षेपार्ह दृश्याबद्दल चित्रपट निर्मात्याने अखेर माफी मागितली. चित्रपटात दाखवलेल्या दृश्यावरून कोणत्याही धर्माचा किंवा व्यक्तीच्या भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता. समुदायाच्या संतापानंतर वादग्रस्त दृश्य चित्रपटातून काढून टाकले आहे, या चुकीबद्दल आम्हाला माफ करा, असे निर्माते आणि इतर टीम सदस्यांनी ‘एक्स’वर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. ख्रिश्चन समुदायाच्या अल्टिमेटमनंतर, बॉलीवूड अभिनेता सनी देओल आणि रणदीप हुड्डा यांच्यासह पाच जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता.