15 मिनिटांत संपूर्ण शरीर धुऊन काढणार, कपड्यांप्रमाणे आता माणसाला धुणारी मशीन

आतापर्यंत कपडे धुणारी, भांडे घासणाऱ्यां मशीनबद्दल ऐकलं होतं. परंतु आता माणसाला धुणारी मशीन आली आहे. जपानने अशी एक मशीन बनवली आहे. या मशीनमध्ये व्यक्तीला अवघ्या 15 ते 20 मिनिटांत धुऊन चकाचक करणार आहे. जपानमधील सायन्स कंपनीने डेव्हलप केलेली मिराई निंगेन सेंटाकुक नावाची ही मशीन आहे. ही मशीन स्पासारखे काम करते. ही मशीन एआयच्या मदतीने लोकांचे शरीर आवश्यकतेनुसार स्वच्छ करेल. यासाठी सर्वात आधी त्या व्यक्तीला पॉडमध्ये बसावे लागेल. जे अर्धे गरम पाण्याने भरलेले असेल. यानंतर हायस्पीड जेटने पाण्याचा फवारा सुरू होईल. शरीराच्या त्वचेला स्वच्छ करण्याचे काम ही मशीन करेल. शरीराच्या तापमानानुसार ही मशीन काम करेल. ही मशीन केवळ शरीर स्वच्छ करणार नाही, तर लोकांचे डोकेसुद्धा शांत करेल. या मशीनची आतापासूनच सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. 15 मिनिटात संपूर्ण शरीर धुऊन काढणाऱ्यां या मशीनची किंमत किती असणार आहे तसेच ही मशीन जपानसह अन्य कोणत्या देशात उपलब्ध होणार आहे याची माहिती समोर आली नाही.

कधीपर्यंत लाँच होणार

शरीर धुऊन काढणाऱ्यां या मशीनला ओसाका एक्सपो 2025 मध्ये पहिल्यांदा समोर आणले जाईल. या ठिकाणी एक हजार लोकांवर याची चाचणी घेतली जाईल. या चाचणीनंतर मशीनला लाँच केले जाईल, असे कंपनीचे अध्यक्ष यासुकी आओयामा यांनी सांगितले.