
जपानमध्ये 3 डी प्रिंटेडच्या वस्तूचा वापर करून 3 डी प्रिंटेड रेल्वे स्टेशन बनवण्यात आले. हे स्टेशन अवघ्या सहा तासांत बनवण्यात आले. कंस्ट्रक्शन फर्म सेरेन्डिक्सने रात्रीची अखेरची ट्रेन गेल्यानंतर आणि सकाळची पहिली ट्रेन येण्याआधी या स्टेशनची निर्मिती करण्यात आली. या स्टेशनवर 530 प्रवाशी थांबू शकतात. कोणतेही स्टेशन बनवण्यासाठी दोन महिन्यांहून अधिक वेळ लागतो. परंतु 3 डी प्रिंटेड स्टेशन बनवण्यासाठी केवळ 6 तास लागले, असे सेरेन्डिक्सचे सह-संस्थापक कुनिहिरो हांडा यांनी सांगितले.