
बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर हिला तब्बल पाच कोटी रुपये किमतीची लॅम्बोर्गिनी कार गिफ्ट म्हणून मिळाली आहे. ही कार जांभळ्या रंगाची आहे. ही कार अनन्या बिरला यांनी दिली आहे. अनन्या बिर्ला या आदित्य बिर्ला ग्रुपचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांची मुलगी आहे. अनन्या बिर्ला या व्यावसायिक महिलेसोबत गायकसुद्धा आहेत. अनन्या बिर्ला यांची नेटवर्थ जवळपास 13 बिलियन डॉलर्स असल्याचे सांगण्यात येते. अनन्या बिर्ला आणि जान्हवी कपूर यांची मैत्री खूप वर्षांपासूनची आहे.