जान्हवी कपूर बॉलिवूडमधील सर्वोत्तम अभिनेत्रींपैकी एक आहे. चित्रपटांव्यतिरिक्त ती आपल्या स्टायलिश लूकने लोकांना वेड लावते. जान्हवी वेस्टर्नपासून ते इंडियन आउटफिट्सपर्यंत सगळ्यात सुंदर दिसते. नुकतेच तिने सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. यावेळी जान्हवीने लाल रंगाची साडी परिधान केली आहे. या साडीमध्ये गोल्डन एम्ब्रॉयडरी आणि जरी वर्क करण्यात आले आहे. जान्हवीने या साडीसोबत फुल स्लीव्हजचा हिरवा रंगाचा ब्लाउज घातला आहे, ज्यावर सोनेरी नक्षी देखील आहे. लाल आणि हिरव्या रंगाचे हे काँबिनेशन अतिशय पारंपारिक आणि क्लासिक दिसत आहे. लुक पूर्ण करण्यासाठी जान्हवीने एक चोकर नेकलेस घातला आहे. यासोबत तिने मॅचिंग कानातले घातले आहेत, ज्यामुळे तिचा लूक आणखी रॉयल दिसत आहे. हेअरस्टाईलबद्दल बोलायचे झाले तर जान्हवीने तिचे केस खुले ठेवले आहेत. तिच्या हे फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत.