
नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण व्हावे यासाठी ‘म्हाडा’च्या मुंबई मंडळातर्फे बुधवार, 23 एप्रिल रोजी दुपारी 12 ते 2 यादरम्यान म्हाडा मुख्यालयातील गुलजारीलाल नंदा सभागृहात जनता दरबार दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबार होणार आहे. नागरिकांनी तक्रारी संबंधित लेखी स्वरूपात 22 एप्रिलपर्यंत म्हाडाच्या मुख्यालयातील कक्ष क्रमांक 408, सहमुख्य अधिकारी, मुंबई मंडळ यांच्या कार्यालयात सादर कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.