जम्मू- कश्मीरमध्ये आणखी एक जवान शहीद

जम्मू-कश्मीरच्या सोपोर येथे दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात लष्कराचा जवान शहीद झाला. सोपोर येथे लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये रविवारपासूनच धुमश्चक्री उडाली आहे. यात दहशतवाद्यांशी लढताना पंगला कार्थिक हा जवान गंभीर जखमी झाला. त्याला घटनास्थळावरून तत्काळ हलवण्यात आले आणि रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेत असताना त्याचा मृत्यू झाला.