Jammu-Kashmir – प्रजासत्ताक दिनी लष्कराने मोठा कट उधळला! पूंछमधून पाकिस्तानी नागरिकाला अटक

प्रजासत्ताक दिनी लष्कराने पूंछमध्ये मोठा कट उधळला आहे. जम्मू-काश्मीरच्या पूंछमध्ये लष्कराने एका पाकिस्तानी नागरिकाला अटक केली आहे. आंतरराष्ट्रीय सीमेवरून या नागरिकाला अटक करण्यात आली असून लष्कराकडून त्याची चौकशी सुरू आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी कठुआमध्ये लष्कराच्या छावणीवर दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला होता. तीन दहशतवादी असल्याचे माहिती मिळते. गोळीबारानंतर दहशतवादी जंगलात पळून गेले. लष्कराकडून या दहशतवाद्यांना शोधण्यासाठी मोहीम सुरू आहे.