![loc](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/loc-1-696x447.jpg)
पूंछमध्ये नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानने बुधवारी हिंदुस्थानी सैन्य चौकीवर हल्ला केला होता. या हल्ल्याला हिंदुस्थानी लष्कराने गुरुवारी प्रत्युत्तर दिले. हिंदुस्थानी सैन्याने पाकिस्तानी चौक्यांवर हल्ला केला. यात पाकिस्तानचे 4 ते 5 सैन्य ठार झाले तर अनेक सैनिक जखमी झाले.
गेल्या आठवड्यापासून नियंत्रण रेषेवरून पाकिस्तान दहशतवाद्यांना घुसवण्याचा प्रयत्न करत आहे. हिंदुस्थानी लष्कर याला सडेतोड प्रत्युत्तर देत आहे. पाकिस्तानकडून वारंवार होत असलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनाबाबत जम्मूमध्ये उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक घेण्यात येणार आहे.
पाकिस्तानने कृष्णा घाटी सेक्टरमध्ये बुधवारी केलेल्या आयईडी स्फोटात हिंदुस्थानी लष्करातील एक कॅप्टन आणि एक सैनिक शहीद झाले. तर एक सैनिक जखमी झाला. कॅप्टन करमजीत सिंग आणि नाईक मुकेश सिंग शहीद जवानांची नावे आहेत.