
पहलगाम येथे TRF च्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच 26 पर्यटकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेच्या 24 तासातच कुलगामममधील तांगमार्ग येथे दहशतवादी व जवानांमध्ये चकमक सुरू झाली आहे. घटनास्थळी जवानांनी TRF च्या कमांडरला घेरलं आहे.
दरम्यान बुधवारी दुपारी बारामुल्ला येथील सीमा भागातून हिंदुस्थानात घुसखोरी करण्याचा दहशतवाद्याचा डाव उधळला. यावेळी झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना जवानांनी कंठस्नान घातलं. या भागात ऑपरेशन सुरू असून संपूर्ण परिसरात कडक नजर ठेवण्यात येत आहे.