जम्मू कश्मीरमध्ये निवडणूकीच्या पाच दिवस आधी मोठी चकमक, दोन जवान शहीद

जम्मू कश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात छत्रू भागात दहशतवादी व जवानांमध्ये झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झाले तर दोन जवान जखमी झाले आहेत.

लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त सुरक्षा पथकाने छत्रू पट्टय़ातील उंचावरील नैदघम गावाच्या परिसरात घेराबंदी आणि शोधमोहीम सुरू केली असता पिंगनल दुगड्डा भागातील जंगलात लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या गोळीबारात जखमी झालेल्या चौघांपैकी नायब सुभेदार विपन पुमार आणि शिपाई अरविंद सिंह हे शहीद झाले अशी माहिती सुरक्षा अधिकाऱयांनी दिली. लष्करानेही दोन जवानांच्या वीरमरणाला दुजोरा दिला आहे.