नियंत्रण रेषेवरुन काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या सात पाकिस्तानी घुसखोरांना हिंदुस्थानी लष्कराने ठार केले. या घसुखोरांमध्ये पाकिस्तानच्या कुख्यात बॉर्डर अॅक्शन टीममधील दहशतवादी आणि 2 ते 3 पाकिस्तानी लष्कारी सैनिकांचा समावेश आहे. जम्मू-काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यातील कृष्णा घाटी सेक्टरमध्ये ही कारवाई करण्यात आली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंदुस्थानी लष्कराने नियंत्रण रेषेवरील चौकीवरील पाकिस्तानी घुसखोरांचा हल्ला उधळून लावला. पाकिस्तानी घुसखोर कुख्यात बॉर्डर अॅक्शन टीमच्या मदतीने हिंदुस्थानी सैनिकांवर हल्ल्याच्या तयारीत होते. या पाकिस्तानी एजन्सीने यापूर्वीही सीमेवर हिंदुस्थानी सैनिकांवर हल्ला केला आहे.