कश्मीर खोऱयातील अनेक डोंगराळ आणि मैदानी भागात तसेच लडाखच्या झोजिला पासमध्ये बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे. साधना टॉप, गुरेझ, पीर पंजाल रेंज, पीर की गली आणि कुपवाडा जिह्यातील सोनमर्ग येथे बर्फाची पांढरी शुभ्र चादर पसरल्याचे चित्र आहे. यानंतर गुलमर्ग आणि सोनमर्गच्या स्की रिसॉर्टमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. हिमवृष्टीमुळे धुक्याने श्रीनगर आणि खोऱयातील इतर भाग व्यापले आहेत. त्यामुळे रस्ते आणि हवाई वाहतूक विस्कळीत झाली आहे. दरम्यान, उत्तर आणि मध्य कश्मीरमध्ये काही ठिकाणी हलक्या हिमवृष्टीसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.