Jammu-Kashmir : किश्तवाडमध्ये बोलेरो कार दरीत कोसळली, चौघांचा दुर्दैवी मृत्यू; दोन बेपत्ता

जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात भीषण दुर्घटना घडली आहे. बोलेरो कार दरीत कोसळल्याने चौघांचा मृत्यू झाला आहे, तर दोन जण बेपत्ता आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथक बेपत्ता लोकांचा शोध घेत आहे.

राज कुमार, मुकेश कुमार, हकीकत सिंग आणि सतिश कुमार अशी मयतांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व जण पद्दारहून मासू गावी चालले होते. यादरम्यान ही दुर्घटना घडली. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. चालकासह दोन जण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे.