विधानसभा निवडणूक झाल्यानंतरही कश्मीरात दहशतवादी हल्ले कमी झाले नाही. रविवारी रात्री गांदरबल जिल्ह्यातील गगनगीर भागात दहशतवादी हल्ल्यात सहा जणांचा मृत्यू झाला. यामध्ये बोगदा प्रकल्पात काम करणारे पाच कामगारांसह एका डॉक्टराचा मृतात समावेश आहे. या हल्ल्यात पाच जण जखमी झाले असून, त्यांना श्रीनगर वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले आहे.
रात्री उशिरा हल्ला झाल्यानंतर सुरक्षा दलांनी तातडीने परिसराला वेढा घातला. यावेळी दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरु केली आहे. या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-कश्मीरचे पोलीस महासंचालक व्ही. के. बिर्डीही घटनास्थळी पोहचले. काश्मीरचे आयजीपी व्हीके बिर्डी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.दहशतवादी हल्ला झालेला परिसर मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचा मतदारसंघ असलेल्या गांदरबल विधानसभेत आहे. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले की, मी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि पीडितांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करतो.
चार दिवसांपुर्वी 16 ऑक्टोबरला शोपियानमध्ये एका तरुणाची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यामुळे दहशतवाद्यांकडून बाहेरील लोक लक्ष्य केले जात आहे. आजच्या हल्ल्यात ठार झालेले पाचही मजूर कामाच्या शोधात कश्मीरात आले होते.
non-local labourers at Gagangir in Sonamarg region. These people were working on a key infrastructure project in the area. 2 have been killed & 2-3 more have been injured in this militant attack. I strongly condemn this attack on…
— Omar Abdullah (@OmarAbdullah) October 20, 2024