Jammu Kashmir – लष्कराच्या वाहनाला उधमपूरमध्ये अपघात, सहा जवान जखमी

जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात लष्कराच्या वाहनाला अपघात झाल्याने सहा जवान जखमी झाल्याची घटना घडली. जम्मूपासून 65 किमी अंतरावर चोपडा मार्केटजवळ रविवारी हा अपघात घडला.

जवानांना छावणीत घेऊन जाणारी बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पडल्याने हा अपघात घडला. अपघाताची माहिती मिळताच बचाव पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत जवानांना बाहेर काढले. जखमी जवानांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.