जम्मू काश्मीरमधील दोडा जिल्ह्यात दहशतवादी व जवानांमध्ये झालेल्या चकमकीत चार जवान शहीद झाले आहेत. सध्या या भागात शोध मोहीम सुरू असून पाकिस्तानातील जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित कश्मीर टायगर्स या ग्रृपने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.
जम्मू कश्मीरमध्ये चकमकीत चार जवान शहीद#JammuKashmir #BREAKING pic.twitter.com/BJiw7JMcuB
— Saamana (@SaamanaOnline) July 16, 2024
सोमवारी रात्री ही चकमक झाली असून दहशतवाद्यांनी जवानांवर केलेल्या गोळीबारात पाच जवान जखमी झाले. सर्व जखमी जवानांना तत्काळ लष्कराच्या रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारादम्यान चौघांचा मृत्यू झाला. यामध्ये एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा देखील समावेश आहे.
Four Indian Army soldiers including an officer have been killed in action during an encounter with terrorists in the Doda area of Jammu and Kashmir. The operations are still going on. More details awaited: Defence officials https://t.co/N7qxseN5jh pic.twitter.com/5fePA8Mihd
— ANI (@ANI) July 16, 2024
दोडा जिल्ह्यातील धारी गोटे उररबागी भागातील जंगलात काही दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर सोमवारी संध्याकाळी उशीरा राष्ट्रीय रायफल्स व स्पेशल ऑपरेशन ग्रृपने तिथे शोध मोहिम सुरू केली. यावेळी दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. त्यानंतर दोन्ही बाजूने चकमक सुरू झाली. या चकमकीत पाच जवान जखमी झाले. त्यांना तत्काळ लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे उपचारादरम्यान एका अधिकाऱ्यासह चार जवानांचा मृत्यू झाला.
या हल्ल्याची जबाबदारी कश्मीर टायगर्स या ग्रृपने घेतली आहे. याच ग्रृपने 9 जुलै रोजी कठुआ येथे लष्कराच्या ताफ्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात 5 जवान शहीद झाले. तर 5 जवान जखमी झाले.